😔 दुख:द.. शासकीय केंद्रात कोरोनावर उपचार घेतल्यानंतर पोलिस हवालदार यांचा घरी परतल्यानंतर चार तासांतच मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 30, 2020

😔 दुख:द.. शासकीय केंद्रात कोरोनावर उपचार घेतल्यानंतर पोलिस हवालदार यांचा घरी परतल्यानंतर चार तासांतच मृत्यू..

वांद्रे पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस हवालदार दिपक हाटे यांचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला. दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार घेतल्यानंतर हाटे यांना घरी सोडण्यात आले होते. घरी परतल्यानंतर चार तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या १६ झाली आहे.

पोलिस हवलदार दिपक हाटे वरळी पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. १८ मे रोजी त्यांची प्रकृती खालावली. कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील केंद्रात दाखल केले गेले. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवलदार दिपक हाटे यांच्याबाबतची एक ध्वनिचित्रफीत शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या चित्रफितीत पोलिस हवलदार दिपक हाटे अशक्त असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी माहिती एका पोलिसाने दिली.

Post Bottom Ad

#

Pages