🚨पुण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या इसमास पोक्सो कायद्याअंतर्गत कोंढवा पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 30, 2020

🚨पुण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या इसमास पोक्सो कायद्याअंतर्गत कोंढवा पोलिसांनी केली अटक..

लॉकडाऊनच्या काळात कोंढवा परीसरात बारावीमध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलगी कॉलेजमधे परीक्षेला जात असतांना एका इसमाने मुलीला त्रास देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाणेमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या गांभीर्याने कोंढवा तपास पथकातील पोलिसांनी तात्काळ फरार आरोपीचा शोध घेत असतांना पोलिस कर्मचारी आदर्श चव्हाण, किशोर वळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा बाळु भिकु उमाप उर्फ कमलेश (वय २६, रा.पिसोळी,पुणे) असे कोंढवा पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात कोंढवा परीसरात बारावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी कॉलेजमध्ये परिक्षेला जात असतांना एका इसमाने त्रास देऊन विनयभंग केला. या घडलेल्या घटनेबाबत अल्पवयीन मुलीने पालकांना सांगितले असता अल्पवयीन मुलीच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाणे मध्ये तक्रार दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीची दखल घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी बाळु भिकु उमाप उर्फ कमलेश (वय २६, रा.पिसोळी,पुणे) याच्यावर कोंढवा पोलिस ठाणेमध्ये गु.र.क्र.७०५/२०२० भादवी कलम - ३५४(ड), ५०९, ५०४, ५०६ पोस्को अँक्ट कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्हयाच्या गंभीर्याने कोंढवा पोलिस ठाणेचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दाखल गुन्ह्यातील आरोपीवर कायदेशीर कारवाईकामी आदेशित केले. तपास पथकातील सहा.पोलिस निरीक्षक चेतन मोरे, सहा.पोलिस निरीक्षक सोराज पाटील, पोलिस शिपाई आदर्श चव्हाण, पोलिस शिपाई किशोर वळे, पोलिस नाईक अमित साळुंखे, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस नाईक सुशील धिवार यांनी तात्काळ फरार आरोपी बाळु भिकु उमाप उर्फ कमलेश याचा शोध घेत असता पोलिस शिपाई आदर्श चव्हाण, पोलिस शिपाई किशोर वळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून आरोपी बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिसोळी गाव पदावमातीमंदीर या ठिकाणी सापळा रचून आरोपी बाळु भिकु उमाप उर्फ कमलेश यास अटक केली.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनील कलगुटकर, कोंढवा पोलिस ठाणे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलिस ठाणे मा.पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाणे तपास पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक चेतन मोरे, सहा.पोलिस निरीक्षक सोराज पाटील, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस नाईक अमित साळुंखे, पोलिस नाईक सुशील धिवार, पोलिस शिपाई आदर्श चव्हाण, पोलिस शिपाई किशोर वळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages