👌 सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 30, 2020

👌 सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे..

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यामध्ये विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या असून याबाबत आज आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड-१९ अर्थात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह थुंकणे व धुम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

याबाबत बोलतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले,
‘सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलिस अधिनियमानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.’

Post Bottom Ad

#

Pages