👉 "३१ मे" जागतिक तंबाखू विरोधी दिन ; तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 31, 2020

👉 "३१ मे" जागतिक तंबाखू विरोधी दिन ; तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या..

दरवर्षी ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणतत ३६ टक्के पुरुष व पाच टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. प्रत्येक तंबाखू खाणारा व्यक्ती तंबाखू आवड म्हणून नाहीतर गरज म्हणून खात असतो.

आपल्या आजूबाजूला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे अनेक लोक आहेत. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी आपण नेहमीच पाहतो. धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपण सर्वजणच जाणतोच. तंबाखू पहिल्यांदा, दुसऱ्यांदा खाल्यावर काही होत नाही, परंतु तिसऱ्यांदा तंबाखूचे सेवन केल्यास त्यातील निकोटीन आणि टार खाल्यानंतर त्यातील निर्माण झालेल्या लाळेतून ती लाळ रक्तात मिसळण्यासाठी २० मिनीटे लागतात. रक्तातील निकोटीनच्या पूर्ततेसाठी ४५ मिनीटाला एक विडा लागतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची..
तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात. परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

तंबाखू खाण्यामागीची कारणे..
▪️ उत्सुकता : आयु्‌ष्यात एकदाही तंबाखू खाल्ली नसेल तरीही त्याची चव कशी असते, ते खाल्यावर कसे वाटते या उत्सुकतेने उत्साही लोक तंबाखू खाण्याकडे वळतात.
▪️ अफवा : तंबाखू खाल्यावर दात दुखणे थांबले जाईल, दातामधून पाणी येणार नाही आणि रात्री जागणर करण्यासाठी तंबाखू उपयुक्त असते असे अफवा पसरवली जातात म्हणून तंबाखू खाल्ली जाते.
▪️ अनुकरण : आपल्या आजूबाजूस असणारा व्यक्ती तंबाखू खाताना त्यांचे अनुकरुन करुन उत्सुकतेने तंबाखू खाण्याकडे भर दिला जातो.
▪️ गरज : अनेकांना काही गैरसमज झालेले असतात की, तंबाखू खाल्याशिवाय कोणते काम होत नाही, काही सुचत नाही, म्हणजे तंबाखू ही आवड नाही तर गरज बनली जाते.
▪️ खोटे अपवाद : तंबाखू पदार्थाचे सेवन केल्यावर आजार उद्भवला जावू शकतो असे सांगूनही काहीजण खोटे अपवाद पसरवून तंबाखू खाण्याकडे भर देतात.

तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून होतात हे आजार..
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे.

आजूबाजूच्या लोकांना व्यसनापासून रोखणे ही सर्वांची जबाबदारी..
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा..

Post Bottom Ad

#

Pages