😷 कंटेनमेंट झोनपुरताच महिनाभर "लॉकडाऊन 5" ; कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 31, 2020

😷 कंटेनमेंट झोनपुरताच महिनाभर "लॉकडाऊन 5" ; कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार..

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत.

कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन 5 ला ‘अनलॉक 1’ असं नाव देण्यात आलं आहे. कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

पहिला टप्पा..
▪️ 8 जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.
▪️ 30 जूनपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यु लागू असणार.

दुसरा टप्पा..
▪️ शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत जुलै महिन्यात निर्णय होणार.
▪️ सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनवर बंदी.

तिसरा टप्पा..
▪️ परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो, थिएटर, जीम, स्विमिंग पूल, बार सुरु करण्याबाबत निर्णय घेणार. आंतरराज्य किंवा राज्यार्तंगत वाहतुकीवर बंदी नसणार आहे. मात्र वाहतूक नियंत्रित करण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले यांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे.

"लॉकडाऊन 5" घोषित करतांना केंद्र सरकारने या काळात पाळावयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी केल्या नमूद..
1) तोंड झाकणे – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना आपलं तोंड झाकणं बंधनकारक असणार आहे.

2) शारीरिक अंतर – प्रत्येक व्यक्तीने एकमेकांपासून 6 फूट अंतर पाळणं अत्यावश्यक आहे. दुकानं आणि खरेदीच्या ठिकाणी संबंधितांनी ग्राहकांमध्ये हे अंतर पाळलं जाईल यासाठी काळजी घ्यायची आहे. तसेच एकावेळी 5 हून अधिक व्यक्ती असणार नाहीत याचीही खबरदारी घ्यायची आहे.

3) सार्वजनिक कार्यक्रम – सार्वजनिक कार्यक्रमांवर अजूनही निर्बंध कायम असणार आहेत. लग्नासाठी अधिकाधिक व्यक्तींची संख्या 50 हून कमी निश्चित करण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी ही संख्या 20 इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.

4) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा मानून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

5) सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, पान-गुटखा-तंबाखू सेवन यावरही बंदी असेल.

6) वर्क फ्रॉम होम – शक्य तितक्या ठिकाणी घरुन काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) प्रयत्न करावा.

7) कामाची ठिकाणं, दुकानं, बाजार, इंडस्ट्रीअल ठिकाणं आणि व्यावसायिक केंद्र यांनी वेळेची बंधनं पाळणं आवश्यक आहे.

8) स्वच्छता आणि तपासणी – प्रवेश, बाहेर पडण्याचे मार्ग आणि एकत्र जमण्याची सामाईक ठिकाणं येथे तापमान तपासणी, हँड वॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

9) कामाच्या ठिकाणी दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण अत्यावश्यक आहे. दरवाजाच्या हँडल आणि इतर अशी ठिकाणं जिथं अनेकांचा स्पर्श होतो त्या ठिकाणांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण शिफ्टप्रमाणे करणं गरजेचं असेल.

10) कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणच्या प्रमुखांनी शारीरिक अंतर पाळलं जाईल, दोन शिफ्टमध्ये अंतर राहिल आणि जेवणाच्या ठिकाणी देखील खबरदारी जाईल यावर बारकाईने लक्ष ठेवावं.

Post Bottom Ad

#

Pages