🚨पुण्यात हुक्क्याची ऑनलाईन ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी' करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने केले जेरबंद; एक लाखाचा ऐवज जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 15, 2020

🚨पुण्यात हुक्क्याची ऑनलाईन ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी' करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने केले जेरबंद; एक लाखाचा ऐवज जप्त..


लॉकडाउन कालावधीत हुक्क्याची ऑनलाईन ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी’ करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा हुक्का भांडी, सहा तंबाखूजन्य फ्लेवर पाकीट, चार मोबाईल फोन, दोन दुचाकी असा एक लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील धर्मादास लुल्लागार्डन येथे करण्यात आली.

मित विजय ओसवाल (वय 19), रॉयल जयराम मधुरम (वय 28), परमेश महेश ठक्कर (वय 24) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
लॉकडाउनमुळे शहरातील सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र, असे असतानाही जादा पैसे कमविण्याच्या हेतूने तिघेजण व्हॉट्स हॉट या वेबसाईटवर हुक्क्याची जाहिरात देऊन घरपोच हुक्का विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे मा.पोलीस उपायुक्त श्री.बच्चन सिंग यांना मिळाली असता त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधून काढत बनावट ग्राहकद्वारे वेबसाईटवरून ऑनलाईनरित्या त्यांच्याशी संपर्क साधत हुक्क्याची मागणी करीत पोलिसांनी कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील धर्मादास लुल्लागार्डन येथे सापळा रचून मित, रॉयल, परमेशला ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी व्हॉट्स हॉट वेबसाईटवर ऑनलाईन हुक्क्याची ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी’ करीत असल्याची कबुली दिली. तसेच या चौकशीत तिघेही जण काहीही कामधंदा करीत नसून, महाविदयालयीन तरुणांना अंमली पदार्थांची विक्री करण्याचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी,
मा.पोलीस उपायुक्त श्री.बच्चन सिंह, मा.पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मोहिते, मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.नीलेशकुमार महाडिक, श्री.संजय गायकवाड, श्री.संदीप साबळे, श्री.अमोल पिलाणे, श्री.मगर, श्री.गुरव, श्री.चौधर यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages