🚨स्थलांतीतांच्या अर्जासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाची मार्गदर्शक नियमावली.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 13, 2020

🚨स्थलांतीतांच्या अर्जासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाची मार्गदर्शक नियमावली..


देशात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही शिथितला दिल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी हजारो मजूर पायी चालत निघाले होते, तर काही जण मिळेल त्या मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. मात्र आता महाराष्ट्र सरकारने राज्यात अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी, विशेष श्रमिक ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत. तर, एसटी बसनेही परराज्यातील नागरिकांना सीमारेषेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस विभागातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच या प्रवाशांना गावी जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने जाहीर केलेल्या नियमावली नुसार राज्यात अडकलेले नागरिक अर्ज करु शकता, असे सांगीतले.
महाराष्ट्र पोलीस विभागाकडे अर्ज दाखल करण्यासाठी नियमावली..
▪️ नागरिकांना Covid19.mhpolice.in वर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करता येईल.
▪️ केवळ इंग्रजीतूनच फॉर्म भरा.
▪️ सर्व कागदपत्रे एकाच फाईलमध्ये एकत्रित करा.
▪️ प्रवास करताना ई-पासची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी सोबत ठेवा.
▪️ पाससाठी एकापेक्षा अधिकवेळा अर्ज करु नका.
▪️ टोकन आयडी सेव्ह करायला विसरु नका.
▪️ अधिकृततेशिवाय वैधते पलिकडे पास वापरु नका.
दरम्यान, सध्या लाखो लोकांकडून स्थलांतरीत होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाकडे अर्ज दाखल केला जात आहे. मात्र, योग्यरितीने अर्ज न भरल्यामुळे किंवा, कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे, पोलीस विभागाने मार्गदर्शक प्रणाली घोषित केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages