😷 पुण्यात रेडझोन बाबत महापालिका आरोग्य विभागाचा निर्णय.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 17, 2020

😷 पुण्यात रेडझोन बाबत महापालिका आरोग्य विभागाचा निर्णय..

पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात तुम्ही राहत आहात..सर्दी, ताप, कोरडा खोकला या सारख्या कोरोना विषाणूशी संबंधित लक्षणे दिसत आहेत. तर महापालिकेला फोन करून तपासणी सेंटरवर आता जाण्याची गरज नाही. मुंबईतील धारावीच्या धर्तीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात आता अँम्ब्युलन्स येणार आहे. तेथेच तुमचे तपासणी करून नमुने घेतले जाणार आहेत. त्यासाठी पाच क्षेत्रीय कार्यालयांसाठी सुसज्ज ऍम्ब्युलन्स तयार करण्यात आल्या आहे.

पुणे शहरातील विषेशत; पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीमध्ये एका महिलेमुळे वीस नागरिक बाधित झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. यावरून वेगाने या भागात या विषाणूचा प्रसार होत आहे. ती रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपयोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात भवानी पेठ, ढोलेपाटील, घोले रोड, येरवडा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत रेडझोनच्या परिसरात नागरिकांच्या तपासणीसाठी पाच ऍम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत. रेडझोन मध्ये या ऍम्ब्युलन्स फिरून बाधित रुग्णांचे नमुने जागेवर घेऊन तपासणीसाठी पाठविणार आहे.

यासंदर्भात महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, 'या ऍम्ब्युलन्स रेडझोन मध्ये जाऊन थांबणार आहेत. तेथील सर्व्हेक्षण टीमला घरोघरी तपासणी करतांना कोणाला लक्षणे दिसल्यास त्यांना तत्काळ ऍम्ब्युलन्सच्या ठिकाणी पाठवून त्यांची नमुने घेण्यात येणार आहे. ती नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.' या तपासणी मध्ये लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. जर संबंधित नागरिकांचे घरीच पुरेशी जागा आहे. त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला जाणार आहे. मुंबईतील धारावीमध्ये अशा प्रकारे मुंबई महापालिकेकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

Post Bottom Ad

#

Pages