😱 पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्सला वारंवार संपर्क साधूनही न आल्यानं एका व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 16, 2020

😱 पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्सला वारंवार संपर्क साधूनही न आल्यानं एका व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू..

आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी वारंवार संपर्क साधूनही अ‍ॅम्ब्युलन्स न आल्यानं एका व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवर तिथल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील नाना पेठेत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. येशूदास मोती फ्रान्सिस (वय-54) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पुणे शहर रेड झोनमध्ये असून शहरातील हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेले भाग सील करण्यात आले आहेत. त्यात नानापेठेचाही समावेश आहे. याच परिसरात ही घटना घडली.

येशूदास मोती फ्रान्सिस यांची प्रकृती शुक्रवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास खालावली. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. फ्रान्सिस कुटुंबीयांना तब्बल अडीच तास खासगी वाहनही मिळाले नाही. यादरम्यान, येशूदास मोती फ्रान्सिस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी डुल्या मारोती चौकात आणलं होतं. तिथून त्यांनी 100 आणि 108 या क्रमांकावर संपर्क साधून अँम्ब्युलन्सची मागणी केली. यावर कोरोनामुळे अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे त्यांना कळाले. अखेर अँम्ब्युलन्स न मिळाल्याने येशूदास मोती फ्रान्सिस यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. पावणे पाच वाजता भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून फ्रान्सिस यांना ससून हॉस्पिटलमघ्ये नेण्यात आले, मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Post Bottom Ad

#

Pages