🚨पुण्यात या पोलिस स्टेशनमधील आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना टेस्टचा अहवाल आला निगेटिव्ह.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 15, 2020

🚨पुण्यात या पोलिस स्टेशनमधील आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना टेस्टचा अहवाल आला निगेटिव्ह..


चंदननगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणारी महात्मा फुले पोलिस चौकीतील सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या (पुरुष व महिला) पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट केली असता, आठही पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल काल निगेटिव्ह आले आहेत.

चंदननगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणारे अनेक पोलिस अधिकारी कर्मचारी काम करत  आहे. परंतु पहिल्या पोलिस कर्मचाऱ्याला  कोरोनाची लागण झाली आहे. पोलिस कर्मचारी (वय 55) दोन दिवसापासुन त्यांची तब्येत ठीक नव्हती. कफचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात गेले असता, तिथे कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट् आला होता.

चंदननगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलिस चौकीतील पोलिस अधिकारी कर्मचारी गेले मार्च महिन्यापासून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ऊन, वारा, पाऊस कोणत्याही ऋतुची तमा न बाळगता अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांपैकी एका पोलिसांला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या आठ पोलिस कर्मचाऱ्याच्या तपासणी केल्या असता, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. इतर पोलिस अधिकारी कर्मचारी हे स्वतःची काळजी, खबरदारीचा घेत आपले कर्तव्य बजावत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages