👌कोरोना रुग्णाचा मृतदेह बांधण्यासाठी कामगारांना मिळणार १००० रुपये.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 13, 2020

👌कोरोना रुग्णाचा मृतदेह बांधण्यासाठी कामगारांना मिळणार १००० रुपये..

कोरोनाच्या काळात सेवेत येणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवशी ३०० रुपयांचा जोखीम भत्ता दिला जात असतानाच आता कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णाचा मृतदेह बांधण्यासाठी आता महापालिका कामगारांना एक हजार रुपये मोजणार आहे. प्रत्येक मृतदेह बांधण्यासाठी एका कामगाराला ५०० रुपये दिले जाणार आहे. एक मृतदेह गुंडाळून बांधण्यासाठी दोन कामगारांची आवश्यकता भासत असल्याने त्या दोघा कामगारांना प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण १ हजार रुपये दिले जात आहे. महापालिकेचा कोणताही कामगार आता कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना हात लावण्यास तयार नाही. त्यामुळे अखेर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने आता प्रोत्साहन भत्ता म्हणून ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कामगार, मृतदेह बांधण्यास तयार होताना दिसत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने बाधित झाल्यामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांचे मृतदेह व्यवस्थित बंदिस्त करून नातेवाईकांकडून पुढील अंत्यसंस्कारासाठी हस्तांतरीत करण्यात येतात. परंतु हे मृतदेह विशिष्ट पध्दतीने बंदिस्त करताना कामगाराच्या आरोग्याला धोका असतो तसेच यासाठी विशेष मेहनतही घ्यावी लागते. त्यामुळे बाधित मृत रुग्णांचे मृतदेह बंदिस्त करणाऱ्या कामगारांना विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे नियमित कर्मचारी तसेच कंत्राट पध्दतीवरील कामगार तसेच रोजंदारी कामगार यांना मृतदेह बंदिस्त करण्यासाठी प्रत्येक मृतदेहामार्ग ५०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता रोख स्वरुपात दिला जाणार आहे. प्रत्येक मृतदेहासाठी २ कामगार लागतात. त्यामुळे प्रत्येक मृतदेहामागे ५०० रुपये याप्रमाणे दोन कामगारांना १ हजार इतका भत्ता दिला जाणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांची विशिष्ट पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येत असून त्यासाठी बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यापासून इतरांना संसर्ग होवू नये म्हणून तो प्लास्टिकमध्ये त्वरीत गुंडाळला जातो. मात्र आज रक्ताच्या नात्यातील लोक आता मृत्यू पावलेल्या आपल्या कोरोनाबाधित आप्ताला हात लावायला तयार नाहीत. तसेच रुग्णालयातील कामगारही अशा रुग्णांना हात लावायला तयार नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. नायर रुग्णालयातचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी याबाबतचे पत्रक जारी करून अशाप्रकारचा प्रोत्साहन भत्ता मृतदेह बांधणाऱ्या कामगारांना देण्यास सुरुवात केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages