👌बांधकाम व्यावसायिकांनी जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 1, 2020

👌बांधकाम व्यावसायिकांनी जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..


👌 बांधकाम व्यावसायिकांनी जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..

कोरोना विषाणूने देशात हाहाकार मजला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व प्रकारच्या व्यवहारांना याचा चांगलाच फटका बसला आहे. याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना असलेल्या नरेडकोने आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना बोलताना गडकरी यांनी बांधकाम व्यावसायिकांना सल्ला दिला.

‘मुंबईत लाखो घरे तयार असून विक्रीतून मोठी किंमत मिळण्याची विकासकांना आशा आहे. मात्र हव्या त्या किमतीला घर विकण्याचे दिवस आता गेले असून विकासकांनी जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हावे,’ असं गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, ‘मुंबईत प्रति चौरस फूट 30 – 40 हजार रुपये भाव मिळेल या आशेवर अनेक विकासकांकडे लाखो सदनिका आजही विक्री अभावी पडून आहेत. परिणामी कर्जाऊ घेतलेल्या करोडो रुपयांचे बँकांच्या कर्जांचे हप्ते भरत बसण्याची वेळ विकासकांवर आली आहे,’ असं देखील त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages