😷 पुण्यात ६९ प्रतिबंधीत क्षेत्र वगळून आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तूंच्या दुकानांचे वेळापत्रक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 13, 2020

😷 पुण्यात ६९ प्रतिबंधीत क्षेत्र वगळून आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तूंच्या दुकानांचे वेळापत्रक..

पुण्यातील ६९ प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित भागात दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. आज बूधवार (दि.१३) पासून या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी परिपत्रक काढून दुकानांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दुकाने सुरू करताना व्यावसायिकांना तसेच ग्राहकांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत सुरू ठेवता येतील, व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी प्रतिबंधीत क्षेत्रात राहणारे असू नयेत, सर्व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे, दुकानातील कर्मचारी तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येकाने मास्क व हातमोजे वापरणे बंधनकराक आहे, कर्मचारी तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरत्क्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. 

पुण्यात प्रत्येक दिवशी सुरू राहणाऱ्या व्यवसायांचे वेळापत्रक..
सोमवार - इस्त्री व लॉन्ड्री दुकान, स्टेशनरी दुकाने, वैद्यकीय साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.

मंगळवार - वाहन दुरूस्तीचे साहित्य, गृहपयोगी सामग्री, तयार फर्निचरची विक्री.

बुधवार - इस्त्री व लॉन्ड्री दुकाने, फूटवेअर, स्टेशनरी तसेच वैद्यकीय साहित्यसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.

गुरूवार - वाहन दुरूस्तीची साहित्य विक्री करणारी दुकाने. गृहपयोगी सामग्री, स्टेशनरी, तयार फर्निचरची दुकाने.

शु्क्रवार - इस्त्री व लॉन्ड्रीची दुकाने, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने, वैद्यकीय साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.

शनिवार - वाहन दुरस्तीचे साहित्य विक्री करणारी दुकाने, गृहपयोगी सामग्री, इस्त्री व लॉन्ड्री तसेच बांधकाम साहित्याची दुकाने, तयार फर्निचरची दुकाने.

रविवार - वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री करणारी दुकाने, गृहपायोगी सामग्री, स्टेशनरी, फूटवेअर, बांधकार साहित्याची विक्री.

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक १६४ रुग्ण सापडले..
पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्याने एका दिवसात रुग्ण सापडण्याचा नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक १६४ रुग्ण सापडले आहेत. गेल्या पाच दिवसांत रोजच रुग्ण संख्येत मोठी भर पडत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात १२० जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दरम्यान विविध रुग्णालयांतील १०७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे; तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने नागरीकांच्या तपासणीचा वेग वाढविला असून, सध्या रोज एक हजाराहून अधिक जणांची तपासणी होत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे. 

Post Bottom Ad

#

Pages