👌पुण्यात ध्वनिप्रदूषणात घट झाल्याने पक्षांची किलबिल पुणेकरांनी अनुभवला.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 19, 2020

👌पुण्यात ध्वनिप्रदूषणात घट झाल्याने पक्षांची किलबिल पुणेकरांनी अनुभवला..

पुणे शहरात एरव्ही सतत वाहनांच्या गोंगाटात, बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या कर्कश आवाजात जगणाऱ्या पुण्यात 23 मार्चनंतर हे सर्व आवाज एकाएकी बंद झाले. त्यामुळेच सामान्यपणे ऐकू न येणारी पक्षांची किलबिल पुणेकरांना जाणवू लागली आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने धावणारे पुणे बऱ्यापैकी शांत झाले आहे. पुण्याच्या ध्वनिप्रदूषणात तब्बल दोन ते आठ डेसिबलने घट झाली असून हे प्रमाण ध्वनिप्रदूषणाच्या 24 टक्के इतके असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुणे महापालिकेतर्फे लॉकडाऊन काळात झालेल्या पर्यावरणविषयक बदलाचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासवर आधारित लॉकडाऊन काळातील पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, मार्च 2020 ते एप्रिल 2020 या कालावधीत शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. शहरातील रहिवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण तब्बल दोन ते आठ डेसिबलने कमी झाले आहे. तर स्वारगेटसारख्या अतिवर्दळीच्या चौकांमध्ये हेच प्रमाण 24 डेसिबलने कमी झाले आहे.

प्रामुख्याने वाहनांची कमी झालेली वर्दळ, ठप्प पडलेले उद्योग, बांधकामवरील बंदी अशा विविध कारणांमुळे हा बदल जाणवत असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिणामी, शहरातील नागरिक आणि पर्यावरणावर याचा चांगला परिणाम दिसत असून, अनेक ठिकाणी प्राणी-पक्षी मुक्तपणे बागडताना दिसत असल्याचे, पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages