😱 मटण विक्रेत्याला कोरोना झाल्याने प्रशासनाची उडाली एकच खळबळ ; ३०० ग्राहकांचा शोध सुरू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 21, 2020

😱 मटण विक्रेत्याला कोरोना झाल्याने प्रशासनाची उडाली एकच खळबळ ; ३०० ग्राहकांचा शोध सुरू..

मटण,चिकन खाताय? सावधान! पुणे,मुंबई आणि औरंगाबादप्रमाणे सोलापूरमध्ये झपाट्याने कोरोनाचा फैलाव होत आहे. यातच एका मटण विक्रेत्याला कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांना हे चांगलच महागात पडणार असं दिसतय. गेल्या आठ दिवसात हा मटण विक्रेता साधारण ३०० ग्राहकांच्या संपर्कात आला आहे. सध्या या ग्राहकांचा शोध सुरू आहे. ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी या कोरोना बाधीत मटण विक्रेत्याचे दुकान आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने करोनाचा फैलाव टाळण्यासाठी मटण व चिकन व्यवसायावर बरीच बंधने आणली होती. परंतु त्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दीही व्हायची. गेल्या काही दिवसांपासून या मटण विक्रेत्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्राहकांचा शोध सुरू..
या मटण विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. मागील आठवडाभरात हा मटण विक्रेता किती आणि कोणकोणत्या ग्राहकांचा संपर्कात आला त्यांची वैद्यकीय चौकशी केली जाणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages