🚨 बनावट पास बनवून देण्यार्याचा गोरखधंदा पोलिसांनी केला उघड ; एकास अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 29, 2020

🚨 बनावट पास बनवून देण्यार्याचा गोरखधंदा पोलिसांनी केला उघड ; एकास अटक..

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अजूनही तो पुढे वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाचे रुग्ण राज्यात कमी न होता दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे सरकारला लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात वेळोवेळी निर्णय घ्यावे लागत आहेत. यामुळे ठिकठिकाणी अनेक लोक अडकून पडले आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेत भामट्यांची एक टोळी सक्रिय झाली असून अशा अडकलेल्या लोकांच्या अडचणीचा फायदा घेत या भामट्यांनी बनावट पास बनवून देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा सुगावा मुंबईतील डोंगरी पोलिसांना लागताच कारवाई करत एकाला अटक केली आहे.

बनावट पास बनवणाऱ्या दोघांपैकी मनोज हुंबे नामक एका युवकाला पोलिसांनी डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
लॉकडाऊन लागू असतांना अतिआवश्यक कारणांसाठीच लोकांना आंतरजिल्हा किंवा दुसऱ्या राज्यात गाडीने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी सरकारने नेमून दिलेल्या प्रक्रियेतून प्रवास परवानगीचा पास घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, या प्रक्रियेचे नियम कठीण असल्यामुळे काहींनी या प्रक्रियेला बगल देत बनावट पद्धतीने पास देण्याऱ्या टोळक्याची मदत घेतली. मुंबईत अशी टोळी सक्रिय झाली असून आत्तापर्यंत या टोळक्याने तब्बल १४७ लोकांना अशा प्रकारे बनावट पास बनवून दिले आहेत.

हे बनावट पास मूळ पासची इतकी हुबेहूब नक्कल असत की त्यामुळे प्रशासनाला किंचितही संशय येत नसे. विशेष म्हणजे, यातले सर्वाधिक पास हे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देण्यात आले आहेत ! हे बनावट पास देऊन अडकलेल्या अडचणीत सापडलेल्यांकडून प्रतिपास तब्बल ५ हजार रुपये उकळले जात असल्याचं देखील पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. हे पास बनवणाऱ्या दोघांपैकी मनोज हुंबे नामक एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या आठवड्याभरात या दोघांनी जवळपास दीडशे लोकांना आणि सोबतच प्रशासनाला देखील चुना लावल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून योग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच पास घ्यावा, असं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages