🙏 कोरोनाच्या लढ्यात दररोज अग्नीपरिक्षा देणारे सैनीक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 3, 2020

🙏 कोरोनाच्या लढ्यात दररोज अग्नीपरिक्षा देणारे सैनीक..


🙏 कोरोनाच्या लढ्यात दररोज अग्नीपरिक्षा देणारे सैनीक..

करोनाने प्रत्येकाची कित्ती आबाळ केली हे काही सांगायची गोष्टं राहिली नाही आता. तो अनुभव अनेक पिढ्यांपर्यंत तस्साच्या तस्सा सांगेल आपली पिढी पुढ्यात असलेल्या पिढ्यांना! आणि आपण ह्या काळात कामी आलेल्या सैनिकाचे धैर्यही मोठ्या मनाने सांगूत. डॉक्टर, पोलिस, बँकर्स , शेतकरी, मेडिया, अजून जेवढे अत्यावश्यक सेवेमध्ये येतात तेवढयांच्या विरकाहान्याही आपण रंगवून सांगू! प्रथमतः त्या सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मनापासून मुजरा! पण काही गोष्टी नजरेआड राहून जातात त्या तश्याच आणि त्यांची दखल घेतली जात नाही.

घरात बल्ब सुरू आहे तोपर्यंत… घरात उन्हाळ्याच्या दिवसांत पंखा, कुलर, एसी, इ, सुरू आहे तोपर्यंत … त्यांची आठवण येतं नाही आपल्याला आणि आलेली आठवणही त्यांनी कुठल महाभयंकर पाप केलय अश्या शब्दांचे बोल त्यांना देवून पाजळत असतो आपण! इथं डोळ्यांत तेल घालून रात्रभर तुमच्या झोपेखातर आपल्या झोपेची राख करणारा हाच महावितरणचा कर्मचारी आपल्या डोळ्यांचा दिवा करतो तेंव्हा तुमची सकाळ प्रसन्न जात असते. तुम्ही मात्र त्याला शिव्या घालून त्याचा उत्साह घालवता! त्याच्यावर कधी कधी हल्लेही करता.

आत्तापर्यंत खांबाला चिकटून शहीद झालेल्या एकाही शहिदांच्या अत्यंयात्रेत लोकांनी अमर रहेंच्या घोषणा दिलेल्या किंवा कुणी नेता त्यांच्या अंत्यसंस्काराला आलाय असं मि आत्तापर्यंत पाहील नाही कुठं. सेवा देत असताना भाजलेल्या त्या शरीराला आजपर्यंत हवा तेवढा न्याय मिळालाच नाही. असं असतानाही हे कर्मचारी कुठलीही हेळसांड न करता दररोज अग्नीपरिक्षा देत असतात. आपलं आयुष्य पणाला लावून! येवढं जिवावर उदार होऊन काम करतं असणारे हे कर्मचारी आपले शत्रूतर नक्कीच नाहीत. फरक जास्त पडतं नसतो. कुणी कुणाच्या प्रामाणिक कार्याचा गौरव केला ह्यामुळ! फक्त तुमचे दोन काळजीवाहू शब्द पाठीवर प्रोत्साहनाची थाप देऊन जातील तेंव्हा बघा. तुमच्या घरातला दिवा जरा जास्तच प्रकाशमान झालेला दिसेल. त्या महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही एक कड्डक salute!!!

Post Bottom Ad

#

Pages