🚨 पुण्यात परराज्यातील नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 4, 2020

🚨 पुण्यात परराज्यातील नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक..


🚨 पुण्यात परराज्यातील नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक..

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या मदतीसाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे नागरिकांची माहिती फॉर्ममध्ये गोळा केली जात आहे. संबंधित भागातील एका व्यक्तीला गटप्रमुख नेमण्यात आले आहे. समन्वय अधिकारी म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (प्रतिनियुक्ती पुणे शहर) सारंग आवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नोकरीनिमित्त परराज्यातील नागरिकांची मोठी संख्या पुण्यात आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर नोकरदार आणि मजूरवर्ग पुण्यात अडकून पडला आहे. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी मिळाली असल्याने प्रत्येकजण गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकांनी पायी वाट धरली होती. त्यानंतर केंद्र सरकारने परराज्यातील नागरिकांना गावी जाण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार परराज्यातील नागरिकांना मूळ गावी पाठविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पुणे पोलिसांना यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात “मायग्रेन्ट पासेस सेल” सुरू केला आहे. त्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी आहेत. नागरीकांना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. माहिती गोळा झाल्यानंतर जिल्ह्यानुसार नागरिकांचे गट केले जाणार असून त्यातील एक गट प्रमुख असणार आहे. ही पूर्ण माहिती झाल्यानंतर या गट प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांना गावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यास पोलीस मदत करणार आहेत.

गावी जाण्यासाठी पूर्ण करावी लागणार ही प्रक्रिया..
▪️ नागरिकांनी परवानगीसाठी अर्ज भरल्यानंतर संबंधित पोलीस उपायुक्त यांच्याकडे पाठविले जाणार आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर संबंधित व्यक्तींना कळवण्यात येईल. त्यानंतर त्यांनी सामाजिक अंतर राखण्यासह पूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे.

▪️ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना फुड पॅकेट आणि सॅनीटायझर व इतर गरजेच्या वस्तूची व्यवस्था करायची आहे.

▪️ सेलमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पीपीई किट असणार असून पोलीस ठाण्यात गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

▪️ पोलिसांनी एक मेल आयडी तयार केला असून या मेलवर अर्ज द्यावे. तर त्या अर्जावर देखील माहिती घेऊन त्यांना गावी जाण्यावबाबत कार्यवाही करावी. नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न येता ऑनलाइन सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यासाठी covid19.mahapolice.in हा मेल तयार केला आहे.

▪️ समन्वय अधिकाऱ्यांनी ही माहिती मिळाल्यानंतर ही माहिती त्या राज्यातील नोडल अधिकारी यांना पाठवतील. त्यांची परवानगी घेतील. त्यानंतर या नागरिकांना पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages