😷 भारतात जुलै महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची होणार वाढ ; जागतिक आरोग्य संघटना.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 10, 2020

😷 भारतात जुलै महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची होणार वाढ ; जागतिक आरोग्य संघटना..

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी आहे कारण सरकारने प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी असंही म्हटलं आहे की जुलै महिन्यात हा रोग नियंत्रित होण्यापूर्वी शिगेला पोहचेल. ते म्हणाले, लॉकडाऊन उचलल्यानंतर आणखी रुग्ण वाढतील पण लोकांनी घाबरू नये. येत्या काही महिन्यांत आणखी काही प्रकरणे असतील परंतु ती स्थिर राहतील. ते पुढे म्हणाले की लॉकडाऊन हटल्यानंतर रुग्णांच्या प्रमाणात थोडीशी वाढ होईल. परंतु यावर, नियंत्रण मिळवता येईल. डॉ.नबारो म्हणाले की, जुलैच्या अखेरीस रुग्ण वाढतील पण परिस्थितीत सुधारणा होईल असं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे कोविड-१९ चा संसर्ग थांबला आहे. परंतु महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्लीसह काही शहरी भागातही याचा प्रसार होत आहे. पण त्वरित उचललेल्या पाऊलांमुळे भारताने त्याचा प्रसार होऊ दिला नाही. जेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्याठिकाणी नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे. ते म्हणाले की, सध्या भारतात रुग्णांची संख्या लोकसंख्येनुसार फारच कमी आहे. डॉ.नबारो म्हणतात की या आजारामुळे बऱ्याच वृद्धांचे मृत्यू झाले आहेत, परंतु ही संख्याही भारतात फारच कमी आहे.

Post Bottom Ad

#

Pages