💉पुण्यात ससून रुग्णालयात मध्यम स्वरुपातील कोरोना रुग्णांवर घेण्यात येणार बीसीजी लसीची पहिली चाचणी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 10, 2020

💉पुण्यात ससून रुग्णालयात मध्यम स्वरुपातील कोरोना रुग्णांवर घेण्यात येणार बीसीजी लसीची पहिली चाचणी..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बीसीजी लसीची पहिली चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाला याबाबतची मान्यता मिळाली आहे. बीसीजी लस कोविड 19 च्या उपचारात काय भूमिका बजावते याबाबत संशोधन सुरु आहे, त्यासाठीचं ही चाचणी घेण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,
बीसीजी लस ही क्षयरोगासाठी वापरली जाते. पुढील आठवड्यापासून या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी त्यासाठी मध्यम स्वरुपातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची निवड केली जाणार आहे. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांवर या काळात विशेष लक्ष दिले जाणार आहे.

क्षयरोग प्रतिबंधक लस (बीसीजी) ही लस प्रामुख्याने क्षयरोगा (टीबी) साठी वापरली जाते. ज्या देशात क्षयरोग किंवा कुष्ठरोग सामान्य आहे तेथे निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते. क्षयरोग सामान्य नसलेल्या भागांमध्ये केवळ जास्त धोका असलेल्या मुलांनाच विशेषत: लसीकरण केले जाते.

तर क्षयरोगाचा संशय असलेल्या प्रकरणांमध्ये वैयक्तिकरित्या तपासणी आणि उपचार केले जातात. ज्या प्रौढांना क्षयरोग नाही आणि पूर्वी लसीकरण केले गेलेले नाही. पण, वारंवार त्यांना लक्षणे आढळून आले आहे. त्यांनादेखील लसीकरण केले जाऊ शकते.

Post Bottom Ad

#

Pages