👌आज पहिल्यांदाच कामगारांना घेऊन जाणारी रेल्वेची विशेष गाडी धावली.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 1, 2020

👌आज पहिल्यांदाच कामगारांना घेऊन जाणारी रेल्वेची विशेष गाडी धावली..


👌 आज पहिल्यांदाच कामगारांना घेऊन जाणारी रेल्वेची विशेष गाडी धावली..
मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. अखेर यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेत कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली. २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

A one-off special train was run today from Lingampalli (Hyderabad) to Hatia (Jharkhand) on request of the Telangana Government & as per the directions of Union Railway Ministry. pic.twitter.com/9YptotxcbV

— ANI (@ANI) May 1, 2020

तेलंगण सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे एएनआयने म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशनानुसार झारखंडमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेला निरोप देण्यासाठी काही रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपपिल्ली स्थनकावर उपस्थित होते.

Special train was run today from Lingampalli(Hyderabad) to Hatia(Jharkhand)on request of Telangana Govt&as per directions of Railway Ministry. Any other train to be planned as per directions of Ministry of Railways&on request from originating&destination states: Railway official pic.twitter.com/JiGias3BaG

— ANI (@ANI) May 1, 2020

महिन्याभराहून अधिक कालावधी लॉकडाउनमध्ये घालवल्यानंतर अखेर आपल्या राज्यात परत जातानाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेकजण खिडकीमधून हात बाहेर काढून रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा निरोप घेताना व्हिडिओत दिसत आहे.

Post Bottom Ad

#

Pages