👌पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या पहिला पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी कोरोनामुक्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 3, 2020

👌पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या पहिला पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी कोरोनामुक्त..


👌 पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या पहिला पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी कोरोनामुक्त..

शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चालक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर कर्मचारी आणि त्याची पत्नी शनिवारी कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे दोघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

संबंधित पोलीस कर्मचारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चालक पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. संपर्कातून पोलीस ठाण्यातल्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांना क्वाराटाईन केले होते. दरम्यान उपचारानंतर पहिला पोलीस कर्मचारी आणि त्याची पत्नी कोरोनामुक्त झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. शनिवारी बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा क्वाराटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती पोलिस ठाणे पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहे.

पोलीस ठाण्यात कोरोना बाधित कर्मचारी संख्या वाढल्याने कामकाज इतर पोलीस ठाण्यातुन करण्यात येत होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेकांना क्वाराटाईन करण्यात आले होते. वरीष्ठ अधिकारी खासगी ठिकाणी राहुन कामकाज पाहत होते. मध्यवस्तीत असणारे पोलीस ठाणे कोरोनाच्या रेड झोनमध्ये असल्याने पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. पोलीस ठाण्याचा परिसर सॅनीटायझेशन करण्यात आले. पोलिसाच्या प्रयत्नाला यश आले असून पूर्वीप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात कामकाज सुरु करण्यात आले आहे. कोरोनामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील जवळपास १०० जणांना क्वाराटाईन केले होते. शनिवारी क्वाराटाईनचा कालावधी संपल्यामुळे पुन्हा पोलीस ठाण्यातून कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोरोनामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून, सर्व आवश्यक कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले. इतर 7 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस दलातील कोरोनाची लागण झालेला पहिला कर्मचारी आणि त्याची पत्नी शनिवारी कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे आनंद झाला असून इतर कोरोना बाधित कर्मचाऱ्यांचया प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. संबंधित कर्मचारी लवकरच कोरोनामुक्त होतील. त्यांच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जात आहे. तसेच क्वाराटाईन पूर्ण केलेल्या सर्वांनी पूर्ण ताकदीने काम सुरू केले आहे. शिवाय सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काळजी घेत आहेत. – स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त

Post Bottom Ad

#

Pages