📣पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लॉकडाऊन संदर्भात देशवासीयांशी संवाद ; २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 12, 2020

📣पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लॉकडाऊन संदर्भात देशवासीयांशी संवाद ; २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार साधला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याची माहिती दिली. आर्थिक पॅकेज जाहीर करताना प्रत्येकाचा विचार करण्यात आल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं आहे.

सोमवारीच पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्या राज्यांमधील कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी मोदींनी ग्रामीण भागाला वाचवा भविष्यात अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी ग्रामीण भागच कामी येणार आहे, अशा सूचना दिल्या होत्या. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांचा सहभाग होता. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेणार का ? असा प्रशन विचारला जात असताना मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल असे मोदींनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवादा मधील महत्वपूर्ण मूद्दे..
▪️ कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली व्यक्त करतो असं मोदी म्हणाले.

▪️ एका व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं असून अशा प्रकारच्या आपत्तीतून आपण कधीच गेलो नसल्याचं मोदी म्हणाले. हा प्रसंग अवघड असला तरी त्यातून खचून न जाता आपल्याला लढावं लागेल आणि पुढंसुद्धा जावं लागेल असं नरेंद्र मोदी पुढं बोलताना म्हणाले.

▪️ कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे,२० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे.

▪️ २० लाख कोटींचे हे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी गती देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे, तसेच हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे.

▪️ या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग यासाठी आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक, शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले.

▪️ २१ वं शतक हे भारताचं आहे हे आपण गेल्या शतकभरापासून ऐकत आलो आहे. करोना संकटामुळे जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याकडे भारताचं पूर्ण लक्ष आहे. जगभरात ४२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं.

▪️ आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्ण विश्वाची चिंता असंही मोदींनी स्पष्ट केलं. भारतात जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा एकही पीपीई किट भारत तयार करत नव्हता.

▪️ सध्याच्या घडीला भारत रोज २ लाख पीपीई किटची निर्मिती करतो आहे. ही बाब अत्यंत अभिमानाची आहे.असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

Post Bottom Ad

#

Pages