👏बिबवेवाडीत कोरोना वायरस वर यशस्वी मात करुन घरी परतलेल्या तरुणाचे टाळ्या वाजवून स्वागत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 2, 2020

👏बिबवेवाडीत कोरोना वायरस वर यशस्वी मात करुन घरी परतलेल्या तरुणाचे टाळ्या वाजवून स्वागत..


👏 बिबवेवाडीत कोरोना वायरस वर यशस्वी मात करुन घरी परतलेल्या तरुणाचे टाळ्या वाजवून स्वागत..

नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने ते गुरुवारी घरी परतले आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्यावतीने आणि स्थानिक नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कोरोना मुक्त रुग्णाचे स्वागत करण्यात आले. बिबवेवाडी परिसरात कोरोनाचे रुग्ण असून त्यातील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहेत तर उर्वरीत रुग्ण लवकरच घरी परततील अशी आशा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.

बिबवेवाडी परिसरातील रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. नायडू हॉस्पिटल येथे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारांतर्गत त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना गुरूवारी दि.३० एप्रिल रोजी घरी सोडण्यात आले. या दिलासादायक घटनेनंतर बीबवेवाडीकर नागरिकांनी त्यांचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला. रुग्ण राहत असलेल्या परिसरात त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक आले होते.
यावेळी, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे मा.पोलिस उपनिरीक्षक श्री. प्रकाश वाघमारे , मा.पोलीस हवालदार श्री. रवींद्र चीप्पा , मा.पोलीस कॉन्स्टेबल श्री. डाके , मा.स्थानिक माजी नगरसेवक श्री. दिनेशभाऊ धाडवे , मा.गनिमी कावा संघटना श्री. संजय वाघमारे व स्थानिक नागरीक आदींनी उपस्थित राहून कोरोनावर मात करीत घरी परतलेल्या रुग्णाचे टाळ्या वाजवत फुलांचा वर्षाव करुन स्वागत केले तसेच कोरोना वायरस वर यशस्वी मात करुन घरी सोडलेल्या तरुणाने नागरिकांना कोरोना वायरस पासून कसा बचाव करायचा व काय नियम पाळायचे हे देखील सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages