🚨पोलिसांनी पाठलाग करून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह दोन आरोपींना केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 12, 2020

🚨पोलिसांनी पाठलाग करून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह दोन आरोपींना केली अटक..

श्रीरामपूर शहरात गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांनी भरधाव वेगात पळून जाण्यार्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करुन दोंघाना पकडले. पोलिसांनी त्याच्याकडुन एक गावठी कट्ट्यसह एक जिवंत काडतुस व एक दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई रघुवीर कारखिले यांनी फिर्याद दिली.

एक गावठी कट्ट्यसह एक जिवंत काडतुस बाळगणारा आरोपी रईस शेरखान पठाण (वय 23), समीर शेरखान पठाण (वय 28 रा. कोंबडगल्ली, रांजणखोल) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस शिपाई अर्जुन पोकळे, सुनिल दिघे, किशोर जाधव, जालिंदर लोंढे, संजय दुधाडे, हरिष पानसंबळ आज शहर परिसरातील रेल्वे रुळावर गस्त घालत असतांना एमआयडीसीकडुन सुतगिरणीकडे जाणाऱ्या रस्त्याने रेल्वे रुळाच्याकडेने सुतगिरणीकडे भरधाव वेगात एका दुचाकीवर जात असलेल्या दोंघाना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दुचाकी माघारी फिरवुन धुम ठोकली. पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग केला त्यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळुन दोघेंही दुचारीवरुन खाली पडले. पोलिसांना पाहुन दुचाकी जागेवर सोडून रेल्वेरुळ ओलांडुन दोंघेही पळाले. अखेर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून रईस पठाण, समीर पठाण यांना ताब्यात घेतले. रईस हा हद्दपार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता समीर पठाणकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळले असुन रईस कडील विनानंबरची एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

Post Bottom Ad

#

Pages