😱 लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाला काहीसा दिलासा; सिलिंडरच्या किंमतीत कपात.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 1, 2020

😱 लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाला काहीसा दिलासा; सिलिंडरच्या किंमतीत कपात..


😱 लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाला काहीसा दिलासा; सिलिंडरच्या किंमतीत कपात..

कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात सामान्य माणसाला काहीसा दिलासा मिळाला आहे. इंडेनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अनुदानित एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलिंडरमध्ये १६२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता हे सिलिंडर ५८१.५० रुपयात उपलब्ध होणार आहे. मुंबईत हे सिलिंडर आता ५७९ रुपयांना मिळणार आहे.

▪️ दिल्ली – ५८१.५० रुपये
▪️ मुंबई – ५७९.०० रुपये
▪️ कोलकाता – ५८४.५० रुपये
▪️ चेन्नई         – ५६९.५० रुपये

यापूर्वी १ एप्रिल रोजी विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६१.५ रुपयांची कपात करण्यात आली होती.
कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात सामान्य माणसाला काहीसा दिलासा मिळालेला आहे. इंडेनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलिंडर ६१.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच हे सिलिंडर आता ७४४ रुपयात उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दिल्लीत विना अनुदानित सिलिंडरची किंमत ८०५.५० रुपये होती.

Post Bottom Ad

#

Pages