😱 पुण्यात गरजवंतांना सेवा देण्याच्या नावाखाली एका आमदाराने मतदार संघातील नागरिकांचा सर्व डेटा केला गोळा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 10, 2020

😱 पुण्यात गरजवंतांना सेवा देण्याच्या नावाखाली एका आमदाराने मतदार संघातील नागरिकांचा सर्व डेटा केला गोळा..


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोण कोणाचा कसा फायदा घेईल, हे सांगता येत नाही. त्यात राजकीय पक्ष आणि नेते म्हटले की सांगायलाच नको. अशा प्रकारे सवलतीच्या दरात घरपोच जेवण, घरपोच औषधे.. ही व अशी भरघोस आश्‍वासन देऊन व्हॉटऍपच्या माध्यमातून नोंदणी करण्यास एका आमदाराने नागरिकांना भाग पाडले. दोन दिवस सेवाही दिली. या सेवेच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांचा सर्व डेटा गोळा झाल्यानंतर महाशयांनी ही सेवा उरकती घेतली. या आमदाराची "अल्पकाळ सेवा" राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक क्षेत्रात "चिरकाल" चर्चेचा विषय ठरली आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळाचा फायदा एका आमदाराने मतदार संघातील मतदारांची माहिती जमा करण्यासाठी कशा प्रकारे करून घेतला, त्यावची चर्चा दबक्‍या स्वरात पक्षात देखील सुरू आहे. मतदार संघातील नागरिकांना सेवा देण्याच्या निमित्ताने त्यांनी व्हॉटसऍपच्या माध्यमातून सुरवातीला जाहिरात केली. त्यासाठी मोबाईल नंबरही उपलब्ध करून दिले. सवलतीच्या दरात घरपोच जेवणासाठी नागरिकांची व्हॉटऍप नंबरवर पहिल्या दिवशी झुंबड उडाली. त्यातून आमदार महाशयांनी स्वत:ची प्रसिद्धीही करून घेतली. नोंदणी केलेल्या लोकांच्या घरात सवलतीच्या दरात जेवण देखील पोचले. नागरिकांमध्येही विश्‍वास निर्माण झाला.

नोंदणी केलेल्या नागरिकांकडून नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशी सर्व माहिती हळूहळू भरून घेण्यात आली. जशी माहिती हाती आली, तसे सवलतीचे दर दुप्पट झाले. तरी देखील नागरिकांनी तक्रार केली नाही. मात्र एके दिवशी नागरिकांनी घरपोच जेवण्यासाठी संपर्क साधला तेव्हा अचानक सेवा बंद झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यानच्या कालावधीत आमदाराच्या या तात्पुरत्या सेवा कार्यामुळे प्रभावित होऊन अनेकांनी मेस देखील सोडली. पुन्हा मेस सुरू करावयाची, तर ती देखील बंद झाली. परिणामी अनेकांना जेवणाची सोय करण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला.

कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आमदाराच्या कर्तृत्वाने अनेक जण अचंबित झाले आहेत. त्यामुळे आमदाराने लढविलेली ही शक्कल पक्षात देखील मतदार संघाबरोबरच पक्षातही चर्चेचा विषय झाली आहे.

Post Bottom Ad

#

Pages