🍵पुन्हा पुन्हा पाणी उकळून पिल्याणे शरीराचे होऊ शकते नुकसान.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 11, 2020

🍵पुन्हा पुन्हा पाणी उकळून पिल्याणे शरीराचे होऊ शकते नुकसान..

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक डॉक्टर लोकांना वारंवार पाणी उकळून पिण्याचा सल्ला देतात. तुम्ही हा सल्ला बर्‍याच वेळा ऐकला असेल. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ? की, चांगल्या आरोग्यासाठी पुन्हा पुन्हा पाणी उकळून पिणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. हे ऐकून बर्‍याच लोकांना आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. त्यामुळे आज आपण पाणी उकळून प्यायल्यामुळे काय होते ? हे जाणून घेऊया..

वास्तविक उकळत्या पाण्यात वारंवार त्यातील पौष्टिक जीव नष्ट होतात. पुन्हा पुन्हा पाणी उकळण्यामुळे त्यामध्ये आर्सेनिक, नायट्रेट आणि फ्लोराइडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

उकळलेले पाणी पुन्हा उकळल्यामुळे त्याची वाफ बाहेर येऊन पुन्हा त्यात जाते. जर उकळलेले पाणी पुन्हा उकळले तर केमिकल रिएक्शन होते.

पाणी गरम केल्यावर नायट्रेट वाढते. परंतु जर ते पुन्हा पुन्हा गरम केले गेले तर ते विषारी बनते. उच्च तापमान नायट्रेटला नायट्रोसामाइन आणि कार्सिनोजेन मध्ये रूपांतरित करते. यामुळे कर्करोग, हृदयविकाराचा झटका, मेंदूचे आजार, प्रजनन यावरही परिणाम होतो. पाण्याला पूर्णपणे जंतुनाशक बनविण्यासाठी, ते कमीतकमी २० मिनिटे उकळले पाहिजे.

Post Bottom Ad

#

Pages