💸निवडणूक शपथपत्रात प्रथमच उद्धव ठाकरेंनी एवढी संपत्ती केली जाहीर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 11, 2020

💸निवडणूक शपथपत्रात प्रथमच उद्धव ठाकरेंनी एवढी संपत्ती केली जाहीर..

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक अर्ज भरला. यावेळी निवडणूक उमदेवार म्हणून भरलेल्या शपथपत्रात प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अधिकृत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेलं नवं घर. सोबतच कर्जत येथे ठाकरे यांचं फार्म हाऊस आहे.

निवडणूक शपथपत्रात उद्धव ठाकरेंनी आपल्या संपत्तीचा स्रोत सुद्धा जाहीर केलं आहे. यामध्ये विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

बऱ्याच वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ठाकरे घराण्यावर त्यांच्या संपत्तीबाबत थेट आरोप केले होते. आपल्या आरोपात नारायण राणे म्हणाले होते कि, संपत्ती जाहीर करावी लागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाहीत. त्यानंतर ठाकरे घराण्यातील व्यक्तींच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती.

Post Bottom Ad

#

Pages