💉पुण्यात राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थे एका महिन्याच्या आत देशातील पहिली अँटीबॉडी टेस्ट किट केली विकसित.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 11, 2020

💉पुण्यात राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थे एका महिन्याच्या आत देशातील पहिली अँटीबॉडी टेस्ट किट केली विकसित..

पूर्ण देश कोरोना विरोधातील लढाई संपूर्ण ताकदीनिशी लढत असतानाच पुण्याने आणखी एका मोठे काम केले आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (National Institute of Virology) देशातील पहिली अँटीबॉडी टेस्ट किट विकसित केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. या टेस्ट किटच्या माध्यमातून शरीरात अँटीबॉडीस तयार झाल्या की नाहीत याची माहिती मिळणार असून त्याचा कोरोना उपचारासाठी मोठा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थे एका महिन्याच्या आत ही किट विकसित केली आहे. त्यामुळे आता अशा प्रकारच्या टेस्ट अतिशय कमी खर्चात आणि जलद गतीने करता येणार आहेत. अडीच तासांमध्ये ९० चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे तसेच पुढील उपचारासाठी त्याचा मोठा उपयोग होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

याशिवाय, कोविड-१९ (कोरोना) विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत. आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ही संस्था असून तिच्या सहकार्याने ही लस विकसित केली जाणार आहे. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी महत्वपूर्ण कार्य असेल. या संशोधनासाठी प्राण्यांवर तसेच पुढील टप्प्यांत माणसांवर प्रयोग करावे लागतील. त्याबद्दलच्या परवानग्या वेळेत मिळण्यासाठी आयसीएमआर बीबीआयएलला मदत करेल. लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक देश प्रयत्नशील आहेत. अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देशांचा यात समावेश आहे. त्यामध्ये एनआयव्ही-बीबीआयएच्या संयुक्त संशोधन प्रकल्पामुळे आता भारतही या देशांत सामील झाला आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचे आकडे हे दिवसेंदिवस वाढतच असून पुणे आणि मुंबईतील कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. काल दिवसभरात पुण्यात 102 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर पाच कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 194 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 92 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2482 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 145 जणांचा मृत्यू झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages