😔 पुण्यात कोरोनामुळे ५८ वर्षीय पोलिसाचा मृत्यू; दिवसभरात आज पाच जणांचा मृत्यू तर जिल्ह्यात दगावलेल्यांची संख्या १०८ वर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, May 4, 2020

😔 पुण्यात कोरोनामुळे ५८ वर्षीय पोलिसाचा मृत्यू; दिवसभरात आज पाच जणांचा मृत्यू तर जिल्ह्यात दगावलेल्यांची संख्या १०८ वर..


😔 पुण्यात कोरोनामुळे ५८ वर्षीय पोलिसाचा मृत्यू; दिवसभरात आज पाच जणांचा मृत्यू तर जिल्ह्यात दगावलेल्यांची संख्या १०८ वर..

पुण्यात आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात करोना आजारावर उपचार घेत असलेल्या एका पोलिसाचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. तर गेल्या काही तासांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १०८ झाली आहे. दरम्यान, पुणे मनपा क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १२४३ वर गेली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर ५८ वर्षीय पोलिसा कर्मचाऱ्याला २४ एप्रिल रोजी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना रक्तदाब आणि लठ्ठपणाचा त्रासही होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.


Post Bottom Ad

#

Pages