🍉 कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक पडले आजारी; उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 2, 2020

🍉 कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक पडले आजारी; उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू..


🍉 कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक पडले आजारी; उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू..

उत्तर प्रदेशातील महोबामध्ये कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक आजारी पडले आहेत.उलट्या आणि अतिसार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला.डॉक्टर म्हणतात की प्रत्येकजण आजारी पडण्याचे कारण म्हणजे अन्नातून विषबाधा. त्या कुटुंबातील प्रत्येकावर महोबा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना महोबामधील पनवाडी या भागातील अग्निहोत्रीपुरा मोहल्ला येथे घडली जिथे नरेंद्र, त्यांची पत्नी मीरा आणि तीन मुलांनी कलिंगड खाल्ल्यानंतर सर्वांना पोटदुखी होऊ लागली. मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र व्यवसायाने जेवण बनविण्याचे काम करतो पण लॉकडाऊनमुळे त्यांना काम मिळत नव्हते. असे म्हटले जात आहे की भूक भागवण्यासाठी त्याने स्वतः कलिंगड खाल्ला तसेच त्याने तो आपली पत्नी आणि मुलांनाही दिला.

मात्र हा कलिंगड खाल्ल्यामुळे नरेंद्र,त्याची पत्नी मीरा आणि मुलांची प्रकृती खालावू लागली. उलट्या, अतिसाराचा त्रास झालेल्या या कुटुंबाला रुग्णवाहिकेतून पानवाडी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे नरेंद्र यांची मुलगी वर्षा हीची प्रकृती गंभीर बनली आणि तिने प्राण सोडले. उर्वरित चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना महोबा जिल्हा रुग्णालयात हलवले.तिथे उर्वरित चौघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की अन्नातील विषबाधामुळे हे सर्वजण आजारी पडले.

विषारी कलिंगड विषयी यापूर्वी असे अहवाल प्राप्त झाले आहेत की ते गोड आणि रंगीबेरंगी बनविण्यासाठी त्यामध्ये केमिकल, सॅकरिन आणि रंगीत द्रावण टाकले जाते. कृत्रिम रंग आणि केमिकलमुळे कलिंगड विषारी असू शकतो जे खाल्ल्यानंतर आरोग्यास हानी पोहोचू शकते.

Post Bottom Ad

#

Pages