😷 पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दाटलोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीत विशेष लक्ष द्यावे ; माजी उपमहापौर आणि नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 9, 2020

😷 पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दाटलोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीत विशेष लक्ष द्यावे ; माजी उपमहापौर आणि नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे..


😷 पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दाटलोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीत विशेष लक्ष द्यावे ; माजी उपमहापौर आणि नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे..

पुणे शहरात झोपडपट्ट्याच्या भागांत दाटीवाटीने राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याने कोरोनाची वेळीच खबरदारी घेतली असती तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील  दाटलोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी भागात विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन माजी उपमहापौर आणि नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

सविस्तर माहिती देताना डॉ.सिद्धार्थ धेंडे म्हणाले..
शहरातील झोपडपट्ट्यातील शौचालयाचा दररोज 200 नागरिक वापर करत असल्याने शौचालयात हातधुण्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने तात्काळ सॅनिटायझेनची नवीन मशीन खरेदी करून तिथे बसविल्यास बऱ्यापैकी कोरोनाचा प्रसार थांबविता येईल, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. प्रशासनाने याची तातडीने दाखल घेऊन उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाचे हे संकट काही प्रमाणात टाळता येईल तसेच पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या क्षेत्रात महापालिकेच्या वॉर्ड स्तरीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुविधा नागरिकांना घराजवळ उपलब्ध झाल्याने नागरिकांना होमकोरोंटाईन ठेवून त्यातील जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांनाच फक्त ऍडमिट करून ट्रीटमेंट दिली तरी महापालिकेवरील ताण कमी होईल, असे डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सहकार आयुक्त सौरभ राव व इतर महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages