🕯️धक्कादायक..कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 13, 2020

🕯️धक्कादायक..कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

देशात कोरोना व्हायरस उग्र रूप धारण करत आहे. महाराष्ट्र राज्यात याचे प्रमाण लक्षणीय आहे. यात प्रशासन व पोलीस कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. परंतु आता पोलीसांनाच कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कर्तव्य बजावत असतांना मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते मुंबईत शिवडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले मुरलीधर शंकर वाघमारे म्हणून कार्यरत होते. कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत असतांना त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये सर्वाधिक 400 पोलीस हे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, नाशिक आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages