🕯️मटका किंग "रतन खत्री"च राहत्या घरी निधन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, May 10, 2020

🕯️मटका किंग "रतन खत्री"च राहत्या घरी निधन..

मटका किंग रतन खत्री यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 

RIP Mr. #RatanKhatri Matka King. Hole #Sattamatka user Cry today. I miss you sir. #matka owner and #satta play always finding you but today everyone cry for this bed news. pic.twitter.com/1I84oMktWS

— SATTA MATKA GOD (@sattamatkagod) May 9, 2020

मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत रतन खत्री आपल्या कुटुंबासमवेत राहत होते.  1964 साली खत्री यांनी कल्याणमधून मटक्याच्या धंद्याला सुरूवात केली होती.

पाहता पाहता त्यांचा धंदा एवढा लोकप्रिय झाला की, त्यांना मटका किंगच लोक म्हणू लागले. गेल्या अनेक दशकांपासून आजमितीस मटका हे अनेकांच्या आवडीचं व्यसन आहे.

खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढण्यामुळे ते प्रसिद्ध झाले. त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांच्या घरात होती.

मागील अनेक दशकांपासून आणि आजही मटका अनेकांचा आवडीचा धंदा आहे. खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात दुख व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

#

Pages