🚨पुण्यात गांज्याची विक्री करणा-या ईसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 10, 2020

🚨पुण्यात गांज्याची विक्री करणा-या ईसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..

पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमधील कोंढवा खुर्द भागात गांज्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिस हवलदार संजय बागल व पोलिस नाईक सुशील धिवार यांना प्राप्त होताच मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलिसांनी छापा टाकून संशयित ईसमास अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गांजा व तत्सम पदार्थांची विक्री करणारा विनोद मालोजी सोनटक्के (वय २६, रा.शिवनेरीनगर गल्ली नंबर ३१,कोंढवा खुर्द, पुणे) असे कोंढवा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमधील शिवनेरी नगर परिसरामध्ये कोणीतरी अज्ञात ईसम गांजा व तत्सम पदार्थांची विक्री करत आहे, अशी बातमी कोंढवा पोलीस ठाण्याकडील पोलिस हवलदार संजय बागल व पोलिस नाईक सुशील धिवार यांना प्राप्त होताच हि बातमी त्यानी कोंढवा पोलीस ठाणे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनावक गायकवाड यांना कळवले त्यानुसार गांजा व तत्सम पदार्थांची विक्री करणारा संबंधित इसमांस जेरबंद करण्याकामी पोलिस उपनिरीक्षक श्री.निकेतन निंबाळकर यांच्या अधिपत्याखाली एका टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवार दि.९ जून रोजी रात्री १०.०५ वाजण्याच्या सुमारास शिवनेरीनगर गल्ली नंबर ३६ कोंढवा खुर्द येथील मागच्या बाजुच्या मोकळया जागेत एक अज्ञात इसम हातात काळया रंगाची प्लॅस्टीक पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसताच पोलिसांनी छापा टाकून आरोपी विनोद मालोजी सोनटक्के (वय २६, रा.शिवनेरीनगर गल्ली नंबर ३१,कोंढवा खुर्द, पुणे) यास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५६४ ग्रॅम गांजा ५५८०/रुपये रक्कमेचा व रोख रक्कम रुपये ४९०/- असा मिळुन एकुण ६०७०/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणेमध्ये गुरन ७१६/२०२० एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम ८(क), २०(य) (ii) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी,
मा.पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी, मा.पोलीस उपआयुक्त परीमंडळ - ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक श्री.निकेतन निंबाळकर, पोलिस हवलदार संजय बागल, पोलिस हवलदार सुरेश भापकर, पोलिस नाईक सुशील धिवार पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस शिपाई किरण मोरे, पोलिस शिपाई राकेश चव्हाण यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages