😱पुण्यात कार्टून पाहू न दिल्याने एका 13 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 10, 2020

😱पुण्यात कार्टून पाहू न दिल्याने एका 13 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

कार्टून पाहू न दिल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाने मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडीत घडला आहे. किरकोळ कारणावरुन मुलाने आत्महत्या केल्याने बिबवेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संबंधित मुलाने सहावीची परीक्षा दिली होती. काल सकाळपासूनच तो घरात कार्टून पाहत होता. त्याच्या घरच्यांनी त्याला अनेकवेळा सांगूनही त्याने ऐकले नाही. शेवटी रागाने टीव्ही बंद करून घरातले सगळे बाहेर गेले. त्यामुळे राग आल्यामुळे मुलाने मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या घेतला. त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Post Bottom Ad

#

Pages