🏅राज्यातील 18 व पुण्यातील 3 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पोलिस पदक जाहीर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 10, 2020

🏅राज्यातील 18 व पुण्यातील 3 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पोलिस पदक जाहीर..

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने यंदा राज्यातील 18 जणांना गृहमंत्र्यांचे पोलिस प्रशिक्षक पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पोलिस बिनतारी संदेश विभागातील दोघांना, तर राज्य गुप्त वार्ता विभागातील एकास असे पुण्यातील तीन पोलिसांना गृहमंत्र्यांचे पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस बिनतारी संदेश विभागातील पोलिस उपनिरीक्षक श्री.महेंद्र कोरे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.विवेकानंद जोशी यांना, तर पुण्यातच असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलिस हवालदार श्री.अनिल साळुंके यांना गृहमंत्र्यांचे पोलिस पदक देण्यात आले आहे.

राज्याच्या उर्वरीत भागातील पदक जाहीर झालेले पोलिस :- 
याबरोबरच पोलिस निरीक्षक श्री.पराग जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.राजेंद्र ठाकरे (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक), पोलिस निरीक्षक श्री.चंद्रकांत गुंडगे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज), सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.वैभव गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.धनंजयकुमार कदम, पोलिस उपनिरीक्षक श्री.दिपक लोणकर ( पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), पोलिस निरीक्षक श्री.शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक श्री.दिनेश गोरीवले (पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, मुंबई), श्री.बालाजी दिघोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.महेंद्र सावर्डेकर (फोर्सवन, मुंबई), श्री.युवराज टेळे, पोलिस नाईक श्री.नागनाथ जामखर्चे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापुर), पोलिस हवालदार श्री.नामदेव मिसाळ, पोलिस हवालदार श्री.ईस्माईल शेख (पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना), श्री.विनोद धारस्कर (पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला).

Post Bottom Ad

#

Pages