🚨पुण्यात डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा व 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 10, 2020

🚨पुण्यात डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा व 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम जप्त..

पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली आहे. आरोपीकडून 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
Six persons, including one serving military personnel detained in possession of multiple denominations of fake Indian and foreign currency. Counting of currency & further investigation underway: Crime Branch, Pune #Maharashtra pic.twitter.com/KamjyHelV3 — ANI (@ANI) June 10, 2020
पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आरोपी डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages