😱पुण्यात वृद्ध नागरीकाकडुन 70 लाख रुपये घेत सदनिका बळकाविणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, June 11, 2020

😱पुण्यात वृद्ध नागरीकाकडुन 70 लाख रुपये घेत सदनिका बळकाविणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास अटक..

फसवणूक व अपहाराच्या गुन्हामध्ये अटक न करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने एका वृद्ध नागरीकाकडुन 70 लाख रुपये घेतले. त्यानंतरही संबंधित नागरिकाला अटक करुन त्याची सदनिका बळकाविणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खडकी पोलिसांनी शेख यास मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

रौफ शेख (वय 55) असे गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फसवणूक व अपहार करण्याच्या प्रकरणात एका वृद्ध व्यावसायिकाविरूद्ध 2017 मध्ये बंदगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला होता. त्यावेळी रौफ शेख हा आर्थिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास शेख याच्याकडे देण्यात आला होता. त्यावेळी शेखने तक्रारदाराला या प्रकरणात अटक न करण्यासाठी त्यांच्याकडुन 70 लाख रुपये घेतले. तसेच त्यांच्या नावावर खड़की येथे असलेली सदनिका बळजबरीने स्वत:च्या नावावर केली. पैसे व सदनिका घेतल्यानंतरही शेखने व्यावसायिकाला अटक केली होती.

Post Bottom Ad

#

Pages