🚨भारतीय लष्कराचा शिक्का असलेला टी शर्ट घालून फिरणार्या एका तोतया लष्करी अधिकार्याला पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, June 11, 2020

🚨भारतीय लष्कराचा शिक्का असलेला टी शर्ट घालून फिरणार्या एका तोतया लष्करी अधिकार्याला पोलिसांनी केली अटक..

दौंड तालुक्यातील एक तोतया लष्करी अधिकारी पकडण्यात आले असून, त्याच्याकडून पदके, सन्मानचिन्ह, गणवेष, आदी जप्त करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. दौंड पोलिस ठाण्यात हवालदार सचिन गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार प्रशांत काळे याच्याविरोधात तोतयागिरी करणे, बनावटीकरण करणे, लोकसेवक नसताना विशिष्ट अधिकारपद धारण करण्याचा बनाव करणे, आदी प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत विजय काळे (वय २७ , रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्या तोतया लष्करी अधिकार्याचे नाव आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी येथे १० जून रोजी जिल्हा परिषद शाळेसमोरून भारतीय लष्कराचा शिक्का असलेला टी शर्ट घालून फिरणार्या प्रशांत काळे यास ताब्यात घेण्यात आले. प्रशांत हा स्वतःला १४ शीख रेजीमेंटमध्ये मेजर म्हणून कार्यरत असल्याचे मित्र, कुटुंबीय व ग्रामस्थांना सांगत होता. त्याचे वागणे संशयास्पद असल्याने त्याच्याविषयी माहिती मिळताच त्याच्यावर पाळत ठेवून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या घरझडतीमध्ये भारतीय लष्कराची विविध पदके, चिन्हे, लष्करातील नियुक्ती पत्र, विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दिले जाणारे पदके, सन्मानचिन्ह, मानचिन्ह, लष्करी गणवेष, एक मोबाईल संच, आदी एेवज आढळल्याने तो जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी,
पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक दत्तात्रेय गुंड, हवालदार रौफ इनामदार, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, नीलेश कदम, महेश गायकवाड, रविराज कोकरे, अनिल काळे, पोलिस नाईक गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षिरसागर व कॅान्स्टेबल अक्षय जावळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages