🚨A.T.S मध्ये नेमणूकीसाठी अर्ज करणाऱ्या १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचा तिढा वर्ष झाले तरी कायम.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 12, 2020

🚨A.T.S मध्ये नेमणूकीसाठी अर्ज करणाऱ्या १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचा तिढा वर्ष झाले तरी कायम..

A.T.S मध्ये नेमणूक व्हावी यासाठी पोलिस आयुक्तालयाला डावलून थेट महासंचालक कार्यालयाला अर्ज करणाऱ्या १२ अधिकाऱ्यांच्या बदलीचा तिढा वर्ष झाले तरी कायम आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकात (A.T.S) बदली होऊनही हे अधिकारी अद्याप मुंबई पोलिस दलात अडकून पडले आहेत. या १२ अधिकाऱ्यांना तत्कालीन आयुक्त संजय बर्वे यांनी वर्षभरापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

१२ पोलिस अधिकारी..
१) वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितील अलकनुरे,
२) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश कदम,
३) पोलिस निरीक्षक सुधीर दळवी,
४) नंदकुमार गोपाळे,
५) ज्ञानेश्वर वाघ,
६) दया नायक,
७) सहायक निरीक्षक दीप बने,
८) विल्सन रॉड्रिग्ज,
९) विशाल गायकवाड,
१०) लक्ष्मीकांत साळुंके,
११) दीपाली कुलकर्णी,
१२) अश्विनी कोळी आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

तत्कालीन आयुक्त संजय बर्वे यांनी १२ अधिकाऱ्यांनवर उपस्थित केला सवाल ?..
त्या वेळी पोलिस दलात सुरू असलेल्या चर्चेनुसार बदलीसाठी इच्छुकांपैकी काही अधिकारी हे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या मर्जीतले किंवा निकटवर्तीय आहेत. याच कारणामुळे महासंचालक कार्यालयाने या अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करूनही मुंबई आयुक्तालयाने त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. बदलीसाठी अर्ज करण्यात गैर काहीही नव्हते. मात्र ते घटक प्रमुखामार्फत म्हणजे आयुक्तांमार्फत महासंचालकांकडे जाणे अपेक्षित होते, अशी बर्वे यांची भूमिका होती. तसेच हेच अधिकारी का ? अन्य अधिकारी ‘A.T.S’मध्ये काम करू शकतील या क्षमतेचे नाहीत का ? असा सवालही बर्वे यांनी उपस्थित केला होता.

आयुक्त परमबीर सिंग यांनी आल्याआल्याच बर्वे यांचे दोन ते तीन निर्णय फिरवले..
बर्वे निवृत्त झाल्यावर हा वाद काहीसा मागे पडला. मार्चमध्ये रुजू झालेले नवे आयुक्त परमबीर सिंग यांनी आल्याआल्याच बर्वे यांचे दोन ते तीन निर्णय फिरवले. त्यात त्यांनी या बारा अधिकाऱ्यांविरोधातील कारणे दाखवा नोटीस रद्द केली. त्यातील पोलिस निरीक्षक वाघ, सहायक निरीक्षक रॉड्रिग्ज, कोळी, कुलकर्णी या चार अधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबई पोलिस दलातून कार्यमुक्त करण्यात आले. याविषयी पोलिस आयुक्त परमबीर सिंग व सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी बोलणे टाळले.

तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेले अधिकारी..
वरिष्ठांच्या संघर्षांमुळे बदली रखडलेल्यांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील कोणी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या अतिरेक्यांचा समूह उद्ध्वस्त करण्यात, संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात तर कोणी बहुचर्चित आयपीएल बेटिंग-फिक्सिंग प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या पोलिस दलातील बदल्या, बढत्यांचे काम प्रलंबित असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Post Bottom Ad

#

Pages