🚨अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी बारामतीमधील गुन्हे शाखा केली बरखास्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

🚨अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी बारामतीमधील गुन्हे शाखा केली बरखास्त..

बारामतीमध्ये कार्यरत असलेली गुन्हे शाखा अर्थात क्राईम ब्रँच नूतन अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी बरखास्त केली आहे. आता लवकरच या शाखेची फेररचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

⏺️ पत्रकारांशी बोलतांना मोहिते यांची आगामी योजनांबद्दल माहिती..
पोलिस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असून कायदा व सुव्यवस्था राखतानाच अवैध व्यवसायांविरुद्ध आम्ही जोरदार कारवाई करू, असा इशाराही मिलिंद मोहिते यांनी दिला. बारामती क्राईम ब्रँचचे काम उत्तम सुरु होते. आता  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दुसरे युनिट बारामतीत सुरु करण्याची योजना आहे. त्या साठी नवीन अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील, अशी माहिती मोहिते यांनी दिली. तुलनेने बारामतीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरी वाहतुकीची समस्या शहरात मोठी आहे. त्याबाबत उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोहिते यांनी सांगितले. वाहतूक कोंडी व अन्य मुद्यांवर संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

⏺️अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे नागरिकांना आवाहन..
नागरिकांमध्ये केवळ वाहतुकीबाबत जनजागृती करुन फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करावी लागते व ती प्रभावीही ठरते. त्यामुळे जनजागृती सुरु ठेऊन दंडात्मक कारवाईही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विना हेल्मेट दुचाकी चालवणे, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे या गुन्ह्यांसाठीही कारवाई करण्यामागे अपघातात कुणाचा जीव जाऊ नये, हीच आमची भावना असल्याचे मोहिते म्हणाले. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पंधरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून नागरिकांनीही काही त्रुटी असतील तर त्या कळवाव्यात, असे आवाहन मोहिते यांनी केले.

Post Bottom Ad

#

Pages