😱खासगी लॅबने ३५ जण निगेटिव्ह असतांनाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल देऊन केला जिवाशी खेळ.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

😱खासगी लॅबने ३५ जण निगेटिव्ह असतांनाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल देऊन केला जिवाशी खेळ..

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 75 लाखांवर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी पातळीवरही खूप प्रयत्न करण्यात आले. खासगी लॅबना याची परवानगी देण्यात आली; परंतु काही लॅब्सनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी उकळल्याचे प्रकार समोर आले. आता तर उत्तर प्रदेशातील एका लॅबने ३५ जणांना निगेटिव्ह असताना कोरोनाबाधित असल्याचा अहवाल देऊन त्यांच्या जिवाशी खेळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने संबंधित लॅबचा परवा ना रद्द केला आहे; तसेच चाचणीतील गोंधळाबद्दल ५ लॅबना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. काही लोकांना ताप, सर्दी असा त्रास होऊ लागला होता. अशात डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. खासगी लॅबने तपासणीनंतर ३५ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला.

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे, या अहवालामुळे त्यांना काही दिवस कोरोनाबाधित रुग्णासोबत आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे आता त्यांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व ३५ जणांनी नंतर सरकारी लॅबमध्ये तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे उघड झाले, त्यामुळेच खासगी लॅबने केलेला संतापजनक गलथानपणा उघडकीस आला. याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने या लॅबचा परवाना तात्पुरता रद्द करून, या गोंधळाची चौकशी सुरू केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages