🚨मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला वाकड पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

🚨मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला वाकड पोलिसांनी केली अटक..

मोक्काच्या गुन्ह्यातील असलेला आरोपी मागील चार महिन्यांपासून फरार होता. फरार आरोपीची प्राप्त माहिती मिळताच त्याआधारे वाकड पोलिसांनी सापळा रचून समीर देविदास बोरकर (वय 24, रा. हिंजवडी) यास अटक केली आहे.

⏺️वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी समीर बोरकर याच्या विरोधात मोक्का अंतर्गत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी समीर बोरकर हा चार महिन्यांपासून फरार होता. दरम्यान तो मुंबई, नारायणपूर भागात चोरून फिरत होता. त्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक नियुक्त करण्यात आले होते. आरोपी समीर बोरकर वाकड परिसरातील विशालनगर भागात येणार असल्याची माहिती तपास पथकातील कर्मचारी दीपक भोसले यांना मिळताच त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशालनगर भागात सापळा रचून आरोपी बोरकर याला शिताफीने ताब्यात घेतले.

सदरची कारवाई,
वाकड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषन कन्हेरकर, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, प्रमोद भांडवलकर, दीपक भोसले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, सुरज सुतार, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages