🚨अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमाचा पाठलागकरून कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

🚨अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमाचा पाठलागकरून कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

पुणे शहरातील कोंढवा गावठाण परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला कोंढवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ९३५०/- रुपये किमतीचा ९३५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

अमली पदार्थाची विक्री करणारा विशाल नारायण रेड्डी (वय ३१, रा. कोंढवा गांवठाण,पुणे) असे कोंढवा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील कोंढवा खुर्द गावठाण परिसरामध्ये अज्ञात इसम अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती कोंढवा गुन्हे शाखा पोलिस पथकाचे कर्मचारी कौस्तुभ जाधव, सुशिल धिवार, अझीम शेख यांना प्राप्त होताच ही माहिती कोंढवा पोलिस ठाणेचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांना कळवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कोंढवा गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांच्या गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा गावठाण, स्मशान भुमीशेजारी सार्वजनिक शौचालयचे मागे, कोंढवा खुर्द,पुणे या ठिकाणी सायंकाळी ०७.२० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला असता एक संशयीत इसम हातामध्ये काळी प्लास्टिकची पिशवी घेऊन संशयास्पद हलचाली करीत असल्याची दिसताच पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांचा त्याइसमाच्या संशयास्पद वागणुकीमुळे संशय बळावल्याने त्याच्या दिशेने जायु लागताच तो पळुन जाऊ लागला पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे व त्यांच्या गुन्हे शाखा पथकाने थोडयाच अंतरावर पाठलाग करून गांजाची विक्री करणारा आरोपी विशाल नारायण रेड्डी (वय ३१, रा. कोंढवा गांवठाण,पुणे) याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ९३५ ग्रॅम ९३५०/- रुपये किमतीचा वजणाचा गांजा व रोख रक्कम ३००/- रुपये असे एकुण ९६५०/ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणेमध्ये गुरन ७१८/२०२० एन.डी.पी.एस ॲक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी,
मा.पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी, मा.पोलीस उपआयुक्त परीमंडळ - ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदशनाखाली कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार शेख, पोलिस हवालदार योगेश कुंभार, पोलिस नाईक सुशील धिवार, पोलिस नाईक घियार, पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस शिपाई अजीम शेख, पोलिस शिपाई किरण मोरे, पोलिस शिपाई क्षिरसागर, पोलिस शिपाई उमाकान्त स्वामी यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages