😱येरवडा कारागृहातून दोन कैद्यांचे पलायन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

😱येरवडा कारागृहातून दोन कैद्यांचे पलायन..

येरवडा भागात सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन कैद्यांनी पलायन केल्याची घटना आज शनिवार दि.13 जून रोजी पहाटे 5.30 वा. सुमारास घडली आहे. त्यामुळे या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांकडून या फरार कैद्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद सय्यद (20, रा. कासारवाडी) हा दरोड्याप्रकरणी तर आकाश बाबूराव पवार (26) हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कैदेत होता. या दोघांना तात्पुरत्या कारागृहात ठेवले असता ते पहाटेच्या सुमारास कारागृहातून पळून गेले.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात गर्ल्स हॉस्टेल येथे तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी नवीन कैद्यांना ठेवण्यात येत आहे. आकाश पवार याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तर हर्षद याच्यावर खडकी पोलिस ठाण्यात सोन साखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना या गुन्ह्यात अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार या दोघांना तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दोघे कैदी पळून गेले. हे दोघे कैदी तात्पुरत्या कारागृहातून पळून गेल्याचे कारागृह प्रशासनाला लक्षात येताच पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages