🚨धक्कादायक.. न्यायालयाच्या आवारात वकीलाने कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दिली जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

🚨धक्कादायक.. न्यायालयाच्या आवारात वकीलाने कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दिली जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल..

पिंपरी न्यायालयात शुक्रवारी दुपारी वाहन नेत असतांना विचारपूस करीत रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगितल्याने वकिलाने दोन पोलिसांना शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संदीप मारुती बर्गे या पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. महिनाभरातील ही सातवी घटना आहे. पोलिसांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात काळेवाडी, बोपखेल, दापोडी, कुडळवाडी , चिंचवड स्टेशन येथे पोलिसांवर हल्ले झाले आहेत.

पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणारा निलेश चौधरी (रा. मधुबन सोसायटी, सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे.

⏺️ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास चौधरी त्याची दुचाकी घेऊन न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये आला. त्यावेळी बर्गे त्याला म्हणाले, पूर्णवेळ न्यायालयात थांबायचे असेल तरच गाडी पार्किंगमध्ये लावा अन्यथा गेटच्या बाहेर उभी करा. मात्र, चौधरी याने काहीही न ऐकता दुचाकी तेथेच उभी केली. त्यानंतर फिर्यादी बर्गे यांनी प्रवेशद्वारावरील रजिस्टरमध्ये नाव व मोबाईल नंबर नोंद करण्यास सांगितले. मात्र, त्यासही त्यांनी नकार दिल्याने फिर्यादी यांनी चौधरी यांना आत जाण्यापासून अडविले. त्यामुळे चौधरी याने त्यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून गेला. तसेच दुचाकीवरुन जात असतांना फिर्यादीसह हवालदार साबळे यांना पुन्हा शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला उद्यापर्यंत जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी संदीप मारुती बर्गे या पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages