😱बनावट वेबसाईटद्वारे बारावीचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 13, 2020

😱बनावट वेबसाईटद्वारे बारावीचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल..

लॉकडाऊनमुळे दहावी बारावीचे पेपर तपासणीचे काम रखडले असले तरी निकालाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात असतानाच याचाच फायदा घेत बनावट वेबसाईटद्वारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना किती टक्के गुण मिळाले असल्याचे मेसेज करत गुणपत्रिकेसाठी मेल करण्यात यावा, असा मेसेज दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर या वेबसाईटची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असल्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. राज्य शिक्षण मंडळाने सोशल मीडियातील मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखांबाबत अनेक अफवा सोशल मीडियामध्ये पसरत असताना आता थेट बारावीचा निकालच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल पाहण्यासाठी सोशल मीडियावर https://mahresult-nic-in आणि home.herokuapp.com/ ही लिंक व्हायरल झाली आहे. या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले नाव, आईचे नाव आणि आसन क्रमांक टाकल्यानंतर त्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा मेसेज येतो.

दरम्यान, या मेसेजमध्ये कोरोनामुळे आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने आम्हाला सर्व डेटा उपलब्ध करण्यात अडचण येत आहे. परंतु एका आठवड्यामध्ये तुमची गुणपत्रिका तुमच्या महाविद्यालयाकडे पाठवण्यात येईल. तेव्हा तुम्ही महाविद्यालयाकडे संपर्क साधा. तसेच तुम्ही उत्तीर्ण झाला आहात तुमचे अभिनंदन तुम्हाला अमुक टक्के गुण मिळाले आहेत. तुम्हाला गुणपत्रिका हवी असल्यास आम्हाला मेल करावा. ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. असा मेसेज त्यामध्ये देण्यात येत असल्याने विद्यार्थी ही यावर विश्वास ठेवत आहेत.

ही वेबसाईट उच्च माध्यमिक शालान्त मंडळाच्या वेबसाईट सारखीच हुबेहूब दिसत असल्याने अनेक विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. विशेष म्हणजे या लिंकवर आपली माहिती वारंवार भरून निकाल पाहिल्यास प्रत्येकवेळी वेगवेगळे टक्के दाखवण्यात येत आहेत. या वेबसाईटमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असून अनेक विद्यार्थी या वेबसाईटला भेट देत आहेत. त्यामुळे बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याकरिता खोटी वेबसाईटसोशल मीडियावर जाहीर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावर शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी करून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तारखा, निकालावर पालक आणि विद्यार्थांनी विश्वास ठेवू नये. तसेच मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल, असे, मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी म्हंटले आहे.

Post Bottom Ad

#

Pages