😔धक्कादायक.. पुण्यात नैराश्यातून पोलीस कर्मचार्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

😔धक्कादायक.. पुण्यात नैराश्यातून पोलीस कर्मचार्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..

कौटुंबिक कलहाच्या नैराश्यातून पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सोमवार पेठ पोलीस वसाहतीत उघडकीस आली आहे. याघटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद समर्थ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलीस नाईक संजय बनसोडे (वय ४०, रा. सोमवार पेठ पोलीस वसाहत) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. संजय बनसोडे यांच्या आकस्मिक जाण्याने आई आणि दोन मुलीवर दुख:चा डोगरच कोसळला आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तपास पथकात पोलीस नाईक संजय बनसोडे नेमणुकीस होते. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी त्यांची पत्नी कौटुंबिक वादातून माहेरी गेली होती. पोलीस नाईक संजय बनसोडे मूळचे इंदापूरचे राहणारे आहेत.पत्नी माहेरी गेल्यानंतर बनसोडे यांनी आई आणि दोन मुलींना मूळगावी पाठवून दिले होते. कौटुंबिक वादामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. रविवारी सकाळी दि.१४ जून रोजी सोमवार पेठ पोलीस वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बनसोडे यांच्या पोलीस वसाहतीतील घराचा दरवाजा बंद असल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घराची कवले उचकटून आत मध्ये बघितले असता गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबतची माहिती शेजारीच असलेल्या समर्थ पोलीस ठाण्यात दिली. बनसोडे यांनी कौटुंबिक कलहाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

#

Pages